पंतप्रधान मोदी ISI च्या निशाण्यावर, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे.

गुप्तचर (Intelligence) यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या टार्गेटवर आहेत. मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या कागदपत्रांवरून समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी (Terrorist Attack) रॅली किंवा रोड शोमध्येही एन्ट्री घेऊ शकतात, दहशतवादी पोलिसांच्या गणवेशातही पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी आत्मघाती हल्ला करू शकतात, एवढेच नाही तर काही दहशतवादी लष्कर तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संपर्कातही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मोदींवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने लष्करला भारतातील सर्व बड्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. पोलिसांच्या गणवेशातील हे दहशतवादी पीएम मोदींवर आत्मघाती हल्ला करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर संस्थेने लष्कर-ए-तैयबाचे संभाषण रेकॉर्ड केले आहे, त्यानंतरच ही माहिती समोर आली आहे. या अलर्टनंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा वाढू शकते असे मानले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.