पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक

0

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटकमधील (Karnataka) हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होता. त्याच दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याजवळ एक युवक पोहोचला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. रोड शो दरम्यान ही घटना घडली. या घटनेवर पोलिसांचे स्पष्टीकरण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात “राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या” (National Youth Festival) उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी पंतप्रधान जनतेचे अभिवादन स्वीकारत होते. त्यावेळी अचानक एक युवक त्यांच्या अगदी जवळ गेला. त्याच्या हातात फुलांचा हार होता. ती माळाही मोदी यांनी स्वीकरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) (SPG) रक्षकही चकीत झाले. एसपीजी कमाडोंनी त्या युवकाला बाजूला केले. त्याच्या हातातील पुष्पहार सुरक्षा रक्षकांनी घेतला व मग तो पंतप्रधानांना दिला. पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यवस्थेत ही घटना म्हणजे गंभीर चुक असे मत सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर झालेली नसल्याचा दावा हुबळी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्यापूर्वी कसून तपासणी करण्यात आली होती. ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या रस्त्याचा संपूर्ण भाग स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ने आपल्या ताब्यात घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 12 जानेवारीला हुबळी येथे रोड शो केला. जिथे त्याच्या सुरक्षेत त्रुटी होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.