मोदींची मोठी घोषणा.. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्ली येथील इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही संपुर्ण भारतीय जनतेला दिली आहे. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी उपस्थित उभारणार त्यांनी ट्विटमध्ये सांगितले.

23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे सुध्दा ते म्हणाले आहेत, ‘ज्या वेळी संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवायला आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवला जाईल.’

Leave A Reply

Your email address will not be published.