पुण्यात ट्रेनर विमान कोसळले…! पायलट जखमी…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पुणे जिल्ह्यात सोमवारी सिंगल-सीटर ट्रेनर विमानाचा अपघात झाला आणि त्यातील महिला प्रशिक्षणार्थी पायलट भावना राठोड जखमी झाल्या, असे पोलिसांनी सांगितले.

छोट्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी परिसरात घडली. सकाळी साडेअकरा वाजता हे विमान एका मोकळ्या मैदानात कोसळले आणि पायलट भावना राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आणि नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे विमान बारामतीतील कार्व्हर एव्हिएशन या खाजगी विमान वाहतूक शाळेचे होते. आणि विमानाने पुण्यातील बारामती विमानतळावरून उड्डाण केले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाचे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.