डॉ. उदय दशरथ बागले यांना रशियाचा यंग सायंटिस्ट अवार्ड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील कबचौ उमविचे (KBC NMU) सेवानिवृत्त अधिकारी डि.बी. बागले यांचे चिरंजीव व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. उदय दशरथ बागले (Dr. Uday Dashrath Bagle) यांना रशियाचा प्रतिष्ठेचा यंग सायंटिस्ट अवार्ड (Young Scientist Award) घोषित झालेला आहे.

डॉ. उदय बागले यांचा रिसर्च टॉपिक हा Development of a Conceptual Technique for Using Dual – Type Non Thermal Technologies to Synthesize fundamental Bioactive food components that are bio available in food systems असून त्यांना रशियन सायन्स अॅण्ड फाऊंडेशनच्या 10.2 मिलीयन रुबल्स एवढया मूल्यांचा प्रोजेक्ट तीन वर्षासाठी मिळाला आहे. यातील संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांनी विविध विषयावर संशोधन केले असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत त्यांचे संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत.

डॉ. उदय बागले हे रशियाच्या साऊथ युरल चेलसबिंग स्टेट युनिर्व्हसीटीत पोस्ट डॉक्टरेटचे शिक्षण घेत असून ते जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युआयसीटी या विभागातून एम.टेक. (पेंटस्) मध्ये 2014 च्या बॅचचे गुणवत्ता यादीत प्रथम स्थानावर होते. ते विद्यापीठाचे सेवानिवृत्त अधिकारी डि.बी. बागले यांचे चिरंजीव आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.