दिलासादायक ! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाढत्या महागाईच्या दिवसात मोठी दिलासादायक बातमी आहे. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. आज जाहीर केलेल्या दरांमध्ये अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता या तिन्ही शहरांमधील नागरिकांना दिलासा मिळाला असून  पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र चेन्नईत पेट्रोल १४ पैशांनी महागलं आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. WTI क्रूड ऑइल आज ०. ० ४ टक्क्यांनी घसरलं असून प्रति बॅरल ८०.०७ प्रति बॅरल आहे. ब्रेंट क्रूड ऑइल ०.०४ टक्क्यांनी कमी झालं असून प्रति बॅरल ८४.३९ प्रति बॅरलने विकलं जात आहे.

चार प्रमुख महानगरांमधील दर 

दिल्ली-  पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

 

चेन्नई-  पेट्रोल १०२.७७ रुपये, डिझेल ९४.३७ रुपये प्रति लिटर

 

मुंबई-  पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

 

कोलकाता-  पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

 

तुमच्या शहराचे इंधन दर असे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोड पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.

Leave A Reply

Your email address will not be published.