ब्रेकिंग.. जळगावात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली महिला अडकली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात जीर्ण इमारत कोसळल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील मस्जिद समोर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.  या इमारतीच्याढिगाऱ्याखाली एक महिला अडकली असून बचावकार्य सुरू आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील अमर चौका जवळील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत ९ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. या ढिगाऱ्याखाली राजश्री सुयोग पाठक (वय ५२) ही महिला अडकली असून या महिलेला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. या जीर्ण इमारतीमध्ये जास्त रहिवास नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे.

यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. महापालिका प्रशासनाने तात्काळ जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटविण्यास सुरुवात केली. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व महापौर जयश्रीताई महाजन यांनी देखील तेथे धाव घेतली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.