राज्यात येत्या चार दिवसांमध्ये या भागात मुसळधार पावसाची शक्यता

0

पुणे;- येत्या4 दिवसांमध्ये म्हणजे आजपासून 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागने दिला आहे. मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. पुणे वेधशाळेचे महासंचाक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान जुलैअखेर मान्सून राज्यातील सरासरी भरून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.