गटारी अमावस्या सोमवारी असल्याने मांसाहारी प्रेमी आज मारणार ताव

0

जळगाव;- येथे 17 जुलै म्हणजे उद्याच सोमवारी गटारी अमावस्या असल्याने अनेक जण अधिक मास व श्रावण महिना सुरू असल्याने या गटारी अमावस्येला अनन्य साधारण महत्व असून

मांसाहारी प्रेमीना श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य असल्याने ते आज रविवारीच गटारी अमावस्या साजरी करतील.

श्रावण सुरु होण्यापूर्वी येणारी अमावस्या ही सर्वांसाठी खूप खास असते. महाराष्ट्रात तिला आषाढी अमावस्या , दीप अमावस्या आणि गटारी अमावस्या असं म्हणतात. गुजरातमध्ये हरियाली अमावस्या कर्नाटकात भीमाना अमावस्या तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या असं म्हणतात. या आषाढी अमावस्येला दुहेरी योग जुळून आला आहे. सोमवारी ही अमावस्या असल्याने सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे.
गटारी अमावस्येला नॉनव्हेज प्रेमी चिकन, मटण, फिशवर मनसोक्त ताव मारतात. पण सोमवारी अमावस्या असल्याने आजच गटारी अमावस्या म्हणजे नॉनव्हेज खालं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.