पती कामावर जाताच विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. घराचे दार उघडे असल्याचे शेजारील महिलेने डोकावून बघितल्यावर घडला प्रकार पाहून महिला घाबरली. यानंतर तिने ही बाब परिसरात सांगितली. तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

आव्हाने (ता.जळगाव) एथिल मनीषा लहू मोरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. लहू मोरे मोलमजुरी करून पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह वास्तव्यास होते. दरम्यान ५ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे लहू मोरे सकाळी कामावर गेले. यानंतर मनिषा या घरात एकत्याच होत्या. घरात कोणीही नसल्याने मनीषाने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

घराचा दरवाजा उघडताच असूनही मनीषा बराच वेळ झाला तरी, बाहेर आली नाही. म्हणून दुपारी साडेबाराच्या सुमारास शेजारील महिलेने आवाज देत घरात डोकावून बघितले. यानंतर मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार पाहून एकच आरडाओरड करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. तात्काळ घटनेची माहिती पती लहू मोरे यांना कळवली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.