तरडी येथील सरपंच, उपसरपंचासह, ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेला विकासकामांचा धडाका तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पारोळा तालुक्यातील तरडी येथील सरपंच, उपसरपंचासह, ग्रामपंचायत सदस्यांनी आमदारच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजुआबा पाटील, शेतकी संघाचे चेअरमन राजेंद्र पाटील, जोगलखेडे येथील अनिल पाटील, तरडी येथील भैय्या पाटील, मुंदाणे प्र.ऊ.येथील एकनाथ पाटील, गणेश मोरे उपस्थित होते.

यावेळी तरडी येथील मिराबाई शोभा वंजारी, उपसरपंच अंकुश भारमल पवार, सदस्य विनोद बल्लु पवार, बारकु पिरन भिल, छोटु रावण भिल, गोकुळ भिला पवार, वसंत पंडील पवार, उत्तम गोबरू पवार, सुनिल प्रेमराज पवार, ब्रिजलाल ताराचंद पवार, राहुल हंसराज पवार, सोनु भास्कर वडर, गणेश रामलाल पवार, सुरेश रोहीदास पवार, सुभाष रोहीदास पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.