गाय वासराची कत्तलीसाठी अवैध वाहतूक; दोघांना पारोळा पोलिसांकडून अटक…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा ते विचखेडा दरम्यान TATA ACE क्र. एम.एच १९ एस ४४३८ या वाहानातुन एक म्हैस, गाय, वासरु असे कत्तलीसाठी धुळे कडे वाहतूक होत आहे. अशी बातमी बातमीदाराकडून पोलिसांना मिली होती. त्यानुसार सप्ला रचत पोलिसांना नमूद टाटा कंपनीच्या छोटा हत्ती वाहनामध्ये म्हैसं, गाय वासरु मिळून आले. दरम्यान वाहनचालक संजय जगन भराडी (३२) रा, महींदळे, गोकुळ नारायण भिल (३५) महिंदळे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच वरील वर्णनाचे प्राणी ताब्यात घेऊन आर.सी.बाफना गौशाळा कुसुंबा जळगाव येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने पाठवण्यात आले आहे. यातील वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले आहे.

सदर प्राणी कत्तली करीता क्रूरतेने डांबून, पाणी चारा याची सुविधा न देता किंवा नियमांचे पालन न करता, आढळून आले सदर कारवाई पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना संदीप सातपुते, पो.काॅ. आशिष गायकवाड, पो.काॅ किशोर भोई, पो कॉ राहुल पाटील, पो कॉ भूषण पाटील, पो कॉ नरेंद्र पाटील, होमगार्ड चेतन पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.