घरात घुसून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षीय महिला घरात झोपलेली असतांना मुलांना जीवे मारण्याची धमकी देत परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुरेश भिकन पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पीडित महिला मुलांसह घरात झोपलेली होती. रात्री 11 वाजेच्या सुमारास पवार याने घरात येऊन तोंड दाबून तुझ्यासह मुलांनाही मारून टाकेल, अशी धमकी देत अत्याचार केला. यानंतर पीडितेने सदर घटना चुलत दिराला सांगत दोघे जण सुरेशच्या घरी जाब विचारायला गेले.

दरम्यान याठिकाणी त्याचे वडील भिकन हरचंद पवार याने त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याबाबत खोटी तक्रार दिली. यानंतर नातेवाईकांनी हिंमत दिल्यानंतर पीडितेने सुरेशविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.