अवैध दारू अड्डयावर पारोळा पोलिसांचा छापा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पारोळा पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यात वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळुन आली ती जप्त करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे.

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील विठ्ठल सुपडू भील हा यांच्या राहत्या घराच्या आडोशाला  विनापरवाना गैर कायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना पोलीस निरीक्षक सुनील पवार सहाय्यक फौजदार इक्बाल शेख, हेड कॉन्स्टेबल नाना पवार, कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील यांनी छापा टाकला. पंधराशे रुपये किमतीची ३० लिटर दारू हस्तगत करण्यात आली. आरोपीला सुगावा लागताच त्याने मात्र तिथुन पळ काढला.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस नरेंद्र गोकुळ पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी विठ्ठल सुपडू भिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.