राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ऊन राहणार कायम

या ठिकाणी येलो अलर्ट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या वातावरणात प्रचंड बदल झालाय. राज्यात कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस.. हवामान विभागाने राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

या ठिकाणी येलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खानदेशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव तसेच नाशिक, सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज आहे. सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.