पारोळा प्रकरण; आमदार चिमणराव पाटील यांची घटनास्थळी भेट…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील एका येथे १४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अश्या अमानवीय घटनेच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन, दोषीवर तात्काळ कारवाई करून सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टात घेऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित उपविभागीय पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना आदेशित केले.

यावेळी शिवसेना पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील व  ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू, तसेच पिडीतेचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य केले जाईल. आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय कसा मिळणार यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.