पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या विचित्र अपघातात 3 महिला ठार ,२० जण जखमी

0

पारोळ्याजवळील विचखेडे गावाजवळील घटना ; जखमींवर जळगाव ,धुळे येथे उपचार

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तालुक्यातील बोळे येथून अंत्यविधीसाठी जाताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप वाहन, ट्रक, जीपच्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला .  तर जवळपास २० जण जखमी झाले. पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात आज शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाला.रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई गिरासे (वय ६५) यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे.

बोळे येथील २० ते२५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधीसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावानजीक हा भिषण अपघात झाला.बोळे ता. पारोळा येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक एमएच १८ एम ५५५४ हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४ चा ताबा सुटल्याने त्याने सदर पीक अपला जोरदार धडक दिली. यात तीन महिलांचा मृत्यू झालेला आहे.

मयत आणि गंभीर पुढीलप्रमाणे

रेखाबाई गणेश कोळी 55, योगिता रवींद्र पाटील वय 40 ,चंदनबाई गिरासे (वय ६५) 3  महिलांचा मृतांमध्ये समावेश असून रणजीत सुरसिंग गिरासे (वय ६०), भरत रामभाऊ गिरासे (वय ६५), राजेशभाई कोळी (वय ४५), भीमकोर सत्तरसिंग गिरासे (वय ५०), भुराबाई मोहनसिंग गिरासे (वय ४०), भुराबाई तात्या गिरासे (वय ४०), रेखाबाई अधिकार गिरासे (वय ५०), नानाभाऊ सुभाष गिरासे (वय ५५), भटाबाई साहेबराव गिरासे (वय ४५), सुनिता गिरासे (वय ४४), भुराबाई भीमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (वय ५०), सय्यद लियाकत (वय २१ रा. मालेगाव), हिराबाई विजयसिंह गिरासे (वय ४०), भीमकोरबाई जगत गिरासे (वय ६०), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (वय ६५), रंजनसिंग भारतसिंग गिरासे (वय ५५), रुपसिंग नवलसिंग गिरासे (वय ६०), दयाबाई रूपसिंग गिरासे (वय ५५), राजेबाई साहेबराव कोळी (वय ४५). आदींचा जखमींमध्ये समावेश असून यातील पाच जण गंभीर असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील सामान्य रुग्णालय उपचारासाठी पाठवण्यात आले असून अन्य काही जखमींना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच उर्वरित जखमींवर पारोळा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.