धक्कादायक; गरम जेवण न मिळाल्याने चक्क आचाऱ्याच्या अंगावर टाकले गरम तेल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका वयातील गरम जेवण न मिळाल्याने जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर उकळते तेल ओतले आहते. तेल ओतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेनं लग्नसमारंभात एकाच खळबळ माजली आहे. यासंबंधी अधिक तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील मूसघाण पोलीस ठाण्याच्या परिसरात पन्नालाल यांच्या मुलीचे बुधवार(ता.२९) रोजी लग्न होते. लग्न कार्यादरम्यान पाहुणे मंडळी जेवणासाठी गेले होते. दरम्यान नवऱ्या मुलाचे काका इंद्रपालही जेवणासाठी काही नातेवाईकांसोबत जेवायला गेले.

गरम चपाती न मिळाल्याने घडला प्रकार
आचारी राजेश चपाती बनवत होता. त्याने एक चपाती भाजली आणि नाहीत उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिली. त्यावर ही चपाती तेथील एका काकांना थंड वाटली. त्यामुळे चपाती थंड का आहे ? असं त्याने विचारलं… परंतु आरोपी काकांना आश्चर्याने गरम चपाती देण्यासाठी काही वेळ थांबण्यास सांगितलते असता, आरोपीला राहू अनावर झाला. काका आणि आचाऱ्यामध्ये चापट वरून वाद सुरु झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, काकांनी रागात येऊन त्याच्या समोर असलेला गरम कढईतले उकळते तेल आचाऱ्याच्या अंगावर फेकले.

या घटनेत पीडित आचारी गंभीररीत्या भाजला गेला आहे. या घटनेनंतर राजेशला जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मुसघाण पोलीस करत करत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.