पारोळा : –राहत्या घरातील शौचालयात एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये ३१ रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक आधार चौधन (वय २९) याने ३१ रोजी दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील शौचालयात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि बाब त्यांची आई व पत्नीस यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नागरिकांना आवाज दिला. त्यानंतर संदीप चौधरी, महेश चौधरी, आधार चौधरी यांनी शौचालयाचा दरवाजा तोडून त्यास बाहेर काढले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. तर तेथून धुळे येथील सिध्देश्वर हॉस्पीटलमध्ये ३१ रोजी दाखल केले. परंतु प्रकृती अधिक खालावल्याने त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता १ रोज पहाटे २.४५ वाजता डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले.