भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार

0

नवी दिल्ली ;- भारतीय हवामान विभागाने भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे. भारतातील विविध भागात एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यंदा उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका मध्य भारताला बसण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातही उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा ‘आयएमडी’कडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या दरम्यान गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमालचल प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल या राज्यासह आदी भागांमध्ये सर्वाधिक उष्णता असणार आहे. याबरोबरच समुद्रकिनारी असलेल्या भागालादेखील उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.