शितल अकॅडमी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा येथील शितल ॲकेडमी येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनापासून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांकडून शितल अकॅडमीचे मुख्याध्यापक विशाल यांचा सत्कार करण्यात आला. व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेऊन उत्स्फूर्तपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले व त्यानंतर शिक्षकांनी त्यांचे मनोगत जागतिक महिला दिनानिमित्त व्यक्त केले. त्यानंतर वकृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण शितल अकॅडमीचे मुख्याध्यापक विशाल यांच्याकडून करण्यात आले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर गौरवी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या सफल होण्यासाठी शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका माळी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.