पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आंतरराष्टीय महिला दिवस’ उत्साहात साजरा..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि.८ मार्च रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आंतरराष्टीय महिला दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. कीर्ती वाघ आणि कु. प्रथम नहाटा यांनी केले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या प्रसंगाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी श्री सरस्वती पूजन करून स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यांनी मंचावर उपस्थित पालक पदाधिकारी यांचे स्वागत प्रसंगी पुष्पगुच्छ देवून गौरव केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेषकरून महिला शिक्षिकांना,व सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

कु.अथर्व चौधरी याने उपस्थित विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.स्त्री शक्ती हा सर्व व्यापी असून आजची स्त्री ही कुटुंब सांभाळून व्यापार,राजकारण,समाजकारण,क्रीडा क्षेत्र ई.सर्वच क्षेत्रात आपल्या सक्षमतेचा ठसा उमटवीत आहेत. म्हणून आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे असे मत यावेळी मांडले. शाळेचे शिक्षक जितेंद्र पाटील यांनी आंतरराष्टीय महिला दिवस’ का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.ज्या समाजात महिलांना आदर व सन्मान मिळतो तो समाज आंतरराष्टीय नव्हे तर जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करतो. स्त्री म्हणजे समाजाचा अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

ई.४ थी च्या विद्यार्थ्यांनी स्त्री शिक्षण चळवळीच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लघु नाटिका प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली. स्त्रियांना कर्तव्यासोबतच मुलभूत हक्क व सुविधा मिळाव्यात हा आग्रह त्यांनी धरल विद्यार्थिनीनी ”कोमल है कमजोर नाही….’ या गाण्यावर बहारदार नृत्य प्रस्तुत केले. या प्रसंगी पोदार स्कूलचे प्राचार्य यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई, राणी लक्ष्मीबाई, रमाई आणि राजमाता जिजाऊ या अनेक रुपात जन्म घेणाऱ्या स्त्रियांचे उदारहण देत, समाजच नव्हे तर देशाला मार्गदर्शन करणाऱ्या स्त्री शक्तीचे महात्म्य मान्य केलेच पाहिजे असा उपदेश केला. स्त्री ही मानवतेचे दुसरे रूप आहे,भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहे,आणि प्रत्येक घराचा सन्मान आहे. ममत्व,करुणा आणि जबाबदारी यांचा संगम म्हणजे स्त्री शक्ती होय असे मत व्यक्त केले. शिक्षकांनी “नन्हीसी चिडिया… अंगना मे फीर आजारे…’ हे महिलांना समर्पित गीत सादर केले. शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कु.तनिष्का पाटील हीने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.