खायच्या पानांमध्ये आहे , कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जगात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगाने होतात. म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रक्ताशी संबंधीत समस्यांचा धोका वाढतो.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे खायचे पान आहे. NCBI वर प्रकाशित एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले की, या हिरव्या पानांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते.

वैज्ञानिकांना आढळून आलं की, खायच्या पानांमध्ये विषारी पदार्थ दूर करण्याची क्षमता असते. पानं अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करू शकतात. आपल्या रिसर्चमध्ये त्यांनी पानांच्या अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट अ‍ॅक्टिविटीचं मूल्यांकन केलं. त्यांनी हे जाणून घेतलं की, पानामुळे LDL Cholesterol म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं किंवा नाही. आपल्या रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळलं की, खायची पानं LDL कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीकरण रोखण्यास सक्षम होते आणि मॅक्रोफेजमध्ये लिपिड जमा करण्यास सक्षम होते.

पानातील पोषक तत्व

खायच्या पानांमध्ये यूजेनॉल आढळतं जे एक नॅच्युरल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे फ्री रॅडिकल्सला नष्ट करतात. यूजेनॉल लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्यास रोखतं आणि आतड्यांमधील लिपिड अवशोषण कमी करतं.

खायच्या पानामध्ये केवळ अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच नाही तर शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. यात आयोडीन, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-1, निकोटिनिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, फायबर आणि मिनरल्स इत्यादी तत्व असतात.

मुळात पान खाण्याची लोकांची पद्धतच चुकीची आहे. जी आरोग्यासाठी घातक आहे. कारण जास्तीत जास्त लोक पानामध्ये तंबाखू आणि नशेचे पदार्थ टाकून खातात. या हिरव्या पानांमध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात. यांच्या सेवनाची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे केवळ हिरवी पाने चावून खा किंवा यांचा रस प्या. हेच अभ्यासकांनी त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितलं आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.