असदचा एन्काऊन्टरमध्ये खात्मा केला त्यांना सुटल्यावर दाखवतो

0

अतीक अहमदची मिशा पिळत पोलिसांना धमकी !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
अतीक अहमद याच्या मुलाचा असद अहमदचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊन्टरमध्ये खात्मा केला आहे. त्याच्या एन्काऊन्टरनंतर पोलिसांनी अतीकची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने या पोलिसांनाच धमकी दिली आहे.

ज्यांनी माझ्या मुलाला मारला त्यांना जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी दाखवतो. मिशा पिळत अतीक अहमदने ही धमकी दिली आहे. अतीक अहमद धमकी देत असताना त्याच्या संपूर्ण गँगचं कंबरडं मोडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. अतीक अहमदचा भाऊ अश्रफ याच्या सद्दाम नावाच्या एका नातेवाईकाविरोधात पोलिसांनी 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

राजू पाल हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या उमेश पाल याच्या हत्येचा कट आपणच रचल्याचे अतीक अहमद याने मान्य केले आहे. तुरुंगात बसूनच आपण हा कट रचल्याचे त्याने म्हटले आहे. आपण आपली बायको शाईस्ता हिलान नवा मोबाईल आणि नवे सिम कार्ड घेण्यासही सांगितल्याचे त्याने मान्य केले. उमेश पालवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि पहिले अंगरक्षकाला ठार मारायचं आणि नंतर उमेश पालची हत्या करायची हे ठरलं होतं असं अतीकने सांगितलं आहे.

देशभरात गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असदचे पुणे कनेक्शन उघडकीस आले आहे. गुरुवारी त्याचा आणि साथीदाराचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. मात्र तत्पूर्वी दीड महिने दोघेही पसार असताना त्यांना पुणे आणि नाशिकमध्ये काही दिवस राहण्यासाठी गुंड अबू सालेम याच्या शार्पशूटर्सनी मदत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुणे पोलिसांकडूनही खातरजमा करण्यात येत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.