पालघर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार, धारण ओव्हरफ्लो

0

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणामध्ये तब्बल ५० टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून, या धरणाच्या खाली असलेल कवडास धारण ओव्हरफ्लो झालं आहे. धारण क्षेत्रात १ जूनपासून आत्तापर्यंत एकूण १ हजार ७३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुख्य धरणांसह पालघर जिल्ह्यातील इतर लहान धरणांमध्ये देखील चांगला पाणीपुरवठा निर्माण झाला आहे. या धरणांमधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरं त्याचप्रमाणे पालघर लागत असलेल्या वसई-विरार महानगरपालिका तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी प्रश्न सुद्धा लवकरच सुटणार आहे.

पावसामुळे रस्ते बंद
भरमसाठ पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे आणि त्याच्या अभावामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीसाठीचे रस्ते बंद आहे. असाच काहीसा प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे गावांचे रस्ते देखील बंद झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.