‘एआय’मुळे संधी वाढतील ; बदल स्वीकारायला शिका ! : प्रा. डॉ. अनिल डोंगरे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

डिजिटल कॅमेरा आल्यानंतर फोटोग्राफरचा रोल बदलला. आता मोबाईलमध्येच कॅमेरा आल्यानंतर सहाजिकच फोटोग्राफर काय करणार असा प्रश्न होता. परंतु अनेकांनी आपले स्कील वाढवले. ज्यांनी स्वतःला अपडेट केले त्यांना नवीन संधी मिळाल्या. त्यामुळे तंत्रज्ञान हे सतत बदलणार आहे. हे बदल स्वीकारण्यासाठी आपण सदैव तयार राहायला हवे. तंत्रज्ञान बदलानंतरच्या गरजा आपण शोधल्यास आपोआपच आपल्याला नवीन संधी सापडतील. ‘एआय’ आणि रोबोटिक्सबाबत नेमके हेच होत आहे. नवे तंत्रज्ञान आल्यावर नवी कौशल्ये विकसित होतात, त्यातून नवे रोजगार उपलब्ध होतात. तसेच संशोधनाच्या बाबतीत आहे, संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात. परंतु आज पर्यंत गरिबी, आजार, युद्ध यावर बहुतेक संशोधन झाले पण त्यांच्यात फारसा बदल झालेला दिसत नाही.

प्रत्येक संशोधनाला ठोस कारण असल्याने संशोधकाने नेहमी जगाच्या कल्याणासाठी संशोधन करायला हवे असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेटचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए शाखेतील प्रथमवर्ष विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळा अर्थात ‘इंडक्शन- आगाज’ या सोहळ्यात मार्गदर्शन करताना केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, श्री. नीरज सेठिया, बीबीए विभागप्रमुख प्रा.योगिता पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टतेच्या काळात विद्यार्थ्यानी स्वतःचे करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतःला कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे असून आपल्यातील ज्ञान, कौशल्य व अनुभव वाढवतानाच आपला दृष्टीकोन हा कायम सकारात्मक व सर्वसमावेशक कसा राहील याकडे लक्ष द्यायला हवे असे सांगितले.

तसेच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश नवीन विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यास मदत करणे, नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांमध्ये संस्थेची आणि महाविद्यालयाची नैतिकता आणि संस्कृती बिंबवणे, त्यांना इतर विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसोबत बंध निर्माण करण्यास मदत करणे आणि त्यांना आपल्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव करून देणे हा आहे. त्याच बरोबर महाविद्यालयामधील उपलब्ध सर्व सोयीसुविधा जसे ग्रंथालय, महाविद्यालयात उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम, विद्यार्थी कल्याणाच्या योजना, धोरणे त्याचप्रमाणे खेळ, कला, साहित्य, संस्कृती, मुल्यशिक्षण याविषयीची सखोल माहीती दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 ची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची जबाबदारी असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालयात वेल डिग्री प्रोग्राम, अॅकड्मिक बॅकोक क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची रायसोनी महाविध्यालयात आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु असल्याचे सांगितले तसेच त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची व हॉबी क्लबची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगत नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांचा परिचय देखील त्यांनी यावेळी करुन दिला.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिल डोंगरे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यानी कोणत्याही बाबतीत संकोच न बाळगता पुढाकार घेऊन नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमुक एखादी गोष्ट मला समजलेली नाही, पण मग मी प्रश्न न विचारता आपले त्या ठराविक बाबतीतील अज्ञान तसेच ठेवतो, हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाठी खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या ‘कॉलेज टू कॉर्पोरेट’ या प्रवासात आपण अधिकाधिक रोजगारक्षम कसे होऊ या दृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे तसेच कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले, की एक मुद्दा चर्चिला जातो तो म्हणजे आता या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होतील, लोक बेरोजगार होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत (एआय) हीच भीती व्यक्त केली जाते. मुळात अशा चर्चा या काही नवीन नाहीत. ८०-९०च्या दशकात संगणक आल्यावर अशाच चर्चा रंगल्या, मात्र वस्तुस्थिती तशी झाली नाही. सुरवातीला वापरासाठी कठीण असणाऱ्या संगणकात मोठे बदल होत गेले. संगणकाने तंत्रज्ञानात, उद्योगात, सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. अनेक नवीन संधी निर्माण झाल्या, तसेच येत्या काही वर्षांत ‘एआय’मुळे बदल होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले तर आभार प्रा. तन्मय भाले यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे समन्वय प्रा. राहुल त्रिवेदी यांनी साधले. यावेळी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयात “आगाज”च्या उद्घाटणा प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अनिल डोंगरे

Leave A Reply

Your email address will not be published.