अकरा कोटी जो गट देणार त्यांना राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा मिळेल

जळगाव राष्ट्रवादी कार्यालयाबाबत ईश्वर विशेषकेली भूमिका स्पष्ट

0
  • ईश्वरबाबूजी शरद पवारांसोबत तर मुलगा मनीषदादा अजितदादांना बरोबर
  • ईश्वरबाबू जैन यांची विशेष मुलाखत

जळगाव – माजी खासदार ईश्वरबाबू जैन यांच्या खांद्यावर नुकतीच पुण्यात शस्त्रक्रिया झाल्याने सध्या डॉक्टरांनी दोन महिन्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. जळगावी बाबूजी सध्या घरी विश्रांती घेत आहेत. घरी निवडक मान्यवरांना ते भेटत आहे. प्रकृती विचारपूस करण्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मत जाणून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव कार्यालयाचा ताबा घेण्याचा दावा अजित पवार गटाने केल्यासंदर्भात बाबूजींनी भूमिका स्पष्ट केली. तसेच अनेक बाबींवर दिलखुलास चर्चा केली. यावेळी दै. लोकशाहीचे संचालक राजेश यावलकरही सहभागी होते.

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन हे शरद पवार यांचे सोबतच राहणार असल्याचे त्यांनी दैनिक लोकशाहीला दिलेल्या खास मुलाखतीतून स्पष्ट केले.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आकाशवाणी चौकातील कार्यालय हे ईश्वरबाबू जैन यांच्या खाजगी मालकीचे असून ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही आत न ठेवता वापरण्यासाठी दिले आहे. याबाबत ईश्वरबाबू म्हणाले, “14 वर्षा पूर्वी या कार्यालयाच्या जागेसह बांधकामासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च आला होता. त्यापैकी निम्मा म्हणजे सव्वा कोटी रुपये पक्षाने द्यावे आणि सव्वा कोटी मी व्यक्तिगत सहन करणार होतो. हा प्रस्ताव राष्ट्रवादी पक्षाला मान्यही होता. तास निर्णय देखील झाला. या निर्णयावर सर्वानी विशेषतः शरद पवार आणि अजित दादा यांनी सहमती दिखील दर्शवली होती मात्र अंमलबजावणी तशी झाली नाही. मी पूर्णच खर्च करून टाकले माळ गेल्या १४ वर्षात एक रुपया देखील कोणी दिला नाही. आता या जागेवर बुईलधान अर्बन बँकेचे कर्ज आहे या कर्ज पोटी मी 13 कोटी रुपये बँकेत भरले. आता देखील ११ कोटीचे कर्ज बाकी आहे. राष्ट्रवादीचा जो गट हि रक्कम जमा करून कर्ज निल करेल त्या गटाला ह्या कार्यालयाचा ताबा मिळू शकेल.  दरम्यान विजेचे बिले दिखील मीच भरले. महापालिकेच्या कराचा भरणा सुद्धा मी भरणा केला. तरीही वीज बिल आणि मनपा कर भरणा ची थकबाकी अजून देखील आहेच.

प्रश्न – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादा गटातर्फे कार्यालयाचा ताबा घेणार असल्याचा दावा केला जातोय!

ईश्वरबाबू – सध्या या कार्यालयावर अकरा कोटी रुपये कर्जाचा बोजा आहे. ज्या गटाकडून हे अकरा कोटी रुपये भरले जातील त्यांना त्या कार्यालयाचा ताबा मी देण्यास तयार आहे.

प्रश्न- आपण शरद पवारांबरोबर आहात. सध्या त्यांच्याच समर्थकांचा त्यावर ताबा आहे. मग शरद पवार गटाला देणार नाही का?

ईश्वरबाबू – याबाबत पवार साहेबांशी यापूर्वीच बोलणे झाले आहे. पक्षाच्या मालकीची अजिंठा चौक परिसरात जागा आहे. त्या जागेत नवीन कार्यालय बांधण्याची इच्छा पवार साहेबांनी व्यक्त केली होती. त्या जागेवर बांधकाम होऊ शकले नाही, तर ती जागा विकून ते पैसे तुम्हाला देऊ, असेही शरद पवार साहेब यांनी मला आश्वस्त केले होते मात्र झाले काही नाही.

प्रश्न – आता कार्यालयाची जागा देण्याविषयी तुमची भूमिका काय?

ईश्वरबाबू – विद्यमान परिस्थितीत कार्यालयाला 14 कोटी रुपये किमतीला मागणी आहे. दोन्ही गटांपैकी जो कोणी फक्त अकरा कोटी रुपये भरेल, त्या गटाला त्या कार्यालयाची मालकी दिली जाईल.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या ताब्याविषयी अजित दादा आणि शरद पवार गटातर्फे जे दोन प्रति दावे करण्यात येत आहेत, त्याबाबत ईश्वरबाबूजींनी व्यक्त केलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे त्या वादावर पडदा पडला आहे. सध्या शरद पवार गटाच्या ताब्यात ते कार्यालय आहे.

प्रश्न – शरद पवार यांचे सोबत सक्रिय राजकारणात राहणार का?

ईश्वरबाबू- राष्ट्रवादी काँग्रेसने विशेषतः पवार साहेबांनी मला खासदार केले. आणखी खूप काही दिले. वयाच्या

70 व्या वर्षापर्यंत मी सक्रिय राजकारण करणार हे या पूर्वीच मी जाहीर केले आहे त्या नुसार पवार साहेबाना भेटून स्पष्ट देखील केले आहे. त्यामुळे मी शेवट पर्यंत शरद पवार साहेबांबरोबर राहील आणि पक्ष वाढी साठी कार्य करेल पण राजकारणात सक्रिय राहणार नाही.

प्रश्न – सध्याच्या राजकारणाविषयी आपली प्रतिक्रिया काय?

ईश्वरबाबू – सध्याचे राजकारण अस्थिर आहे. फार विकोपाला गेले आहे. ना बोललेले बरं

 

मनीष जैन यांचा स्वतंत्र निर्णय

ईश्वरबाबू जैन हे शरद पवारांचे कट्टर समर्थक असून ते शरद पवारांच्या सोबत असले तरी, त्यांचे सुपुत्र मनीष जैन यांनी मात्र अजित दादांना समर्थन दिले आहे. त्यामुळे एका घरात पिता पुत्राची भूमिका वेगळी आहे. मनीष जैन यांनी घेतलेल्या भूमिकेचे तुम्ही समर्थन करता का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मनीष जैन यांनी घेतलेला तो स्वतंत्र निर्णय आहे. त्यांनी आगामी भविष्याच्या दृष्टीने ही भूमिका घेतली असेल.

 

अजितदादांनी शब्द पाळला नाही

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले होते. त्यासाठी पक्षाचे खजिनदार हेमंत टकले यांना त्यांनी भेटायला सांगितले होते. नाशिकला जाऊन अनेक वेळा हेमंत टकले यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अजित दादांना ही बाब सांगितली, परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खंत ईश्वरबाबू जैन यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.