मनपा च्या सभागृहाचे होणार नूतनीकरण !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहाचे शासन निधींतून नूतनीकरण करण्यास महासभेने मान्यता प्रदान केली असुन, त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये भविष्यातील वाढणारी सदस्य संख्या नुसार बैठक व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्क्रीन, माईक, सेन्ट्रल ए सी, लाईव्ह प्रक्षेपणव्यवस्था, मीडिया साठी व्ययस्था करण्यात येणार आहे. या बाबत आज महापौर दालनात बैठक घेण्यात आली व त्यावर चर्चा करण्यात आली आहे. सदर सभागृह सन २००० पासुन वापरण्यात येत आहे व त्याचे नूतनीकरण करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.