मनपा शाळा क्रमांक 38 येथे आयुक्त वर्षा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील मनपा शाळा क्रमांक 38 जळगावच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाने डॉ. वर्षा गायकवाड (Dr. Varsha Gaikwad) आयुक्त यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रकाश सोनवणे प्रभाग अधिकारी कर वसुली विभाग आणि त्यांच्या स्टाफ ने कार्यक्रमाचे आयोजन केले.

आयुक्त वर्षा गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील, रंजना भरत सपकाळे सभापती प्रभाग २ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कुंदन भाऊ काळे व रेशमा काळे नगरसेवक यांनी ट्री गार्ड दिल्याबद्दल तसेच धीरज सोनवणे नगरसेवक यांनी गेटवर रंगीत नाव लिहून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी शहरातील नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, सदस्य, मनपा कर्मचारी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या असते जवळपास पंधरा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व ट्री गार्ड बसविण्यात आले. मा आयुक्त वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत केक कापून तसेच एका विद्यार्थिनीच्या हस्ते केक खाऊन, विद्यार्थ्यांना केक व खाऊ वाटत त्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना दोन संगणक संच देण्याचे जाहीर करण्यात आले. प्रसंगी उपायुक्त (शिक्षण) सुनिल गोराणे, मुख्याध्यापक डॉ. अशोक सैंदाणे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.