पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांचा राजीनामा !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धाच्या सुपार्श्वभूमीवर पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांनी राजीनामा दिला आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला असून अद्याप त्यांनी राजीनामा स्विकारलेला नाही.

मोहम्मद शतयेह यांच्या राजीनाम्यामुळे अमेरिकाप्रणित सुधारणांचे दरवाजे उघडू शकतात, अशी बोललं जात आहे. युद्ध संपल्यानंतर गाझावर शासन करण्यासाठी सुधारित पॅलेस्टिनी ऑथरिटी अमेरिकेला हवे आहे. पण ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यात अनेक अडथळे असल्याचंही दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.