पाकिस्तानने षढयंत्र ;काश्मीरवरून भारताविरुद्ध कट रचण्यासाठी तयार केले ‘टूलकिट’ !

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
एकीकडे दिवाळखोरीला लागलेला पाकिस्तान भारताविरुद्ध काही गेल्या कुरापती थांबवत नसून याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणांना याची माहिती लागली असून पाकिस्तानचे षढयंत्र पुन्हा समोर आले आहे. इस्लामाबादमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील सर्व पाकिस्तानी मिशनला पाठवलेल्या या गुप्त नोटमध्ये काश्मीरवरून भारताविरुद्धचा कट कसा राबवायचा यासाठी टूलकिट तयार केल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान जगभरातील त्यांच्या पाकिस्तानी मिशनसह काश्मीरबाबत खोटी माहिती पसरवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांच्याकडून एक टूलकिट देखील तयार करण्यात आले आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीमुळे काश्मीरबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याची आणि जगभरातील आपल्या मिशनद्वारे निदर्शने आयोजित करण्याची योजना आखली . 5 फेब्रुवारीला काश्मीर एकता दिनाच्या नावाखाली पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्याचा मोठा डाव आखला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.