पाचोरा नगरपरिषदेत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा नगरपरिषद पाचोरा सार्वत्रिक निवडणूक – २०२२ आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानूसार दि. १३ जुन रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद सभागृह येथे आयोजीत करण्यात आलेला होता. त्यानूसार एकूण १४ प्रभागांमधून २८ सदस्य संख्या यापुर्वीच निश्चीती झालेली होती. त्यानूसार खालील तक्त्याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रभाग क्र. (१) अ – अनुसुचीत जाती (महिला), प्रभाग क्र. (१) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (२) अ – अनुसुचीत जाती (महिला), प्रभाग क्र. (२) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (३) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (३) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (४) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (४) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (५) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (५) ब-  सर्वसाधारण

प्रभाग क्रं. (६) अ – अनूसुचीत जमाती, प्रभाग क्र. (६) ब- सर्वसाधारण (महिला),

प्रभाग क्र. (७) अ – अनूसुचीत जाती, प्रभाग क्र. (७) ब – सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. (८) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (८) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (९) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (९) ब- सर्वसाधारण

प्रभाग क्र. (१०) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (१०) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (११) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (११) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (१२) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (१२) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (१३) अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (१३) ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. (१४) अ – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. (१४) ब – सर्वसाधारण

सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना दिनांक १५ जुन २०२२ ते २१ जुन २०२२ पावेतो मागविण्याचा कालावधी आहे.  सदर बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पडला. सदर आरक्षण सोडतीकरीता गो. से. हायस्कूल कडून आलेले शिक्षक रविंद्र जाधव यांच्या समवेत असलेले विद्यार्थी चि. देवांश प्रमोद महाजन (इ. ५ वी) व कु.गित जितेंद्र महाजन (इ. ६ वी) या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वांसमोर चिठ्ठी काढण्यात आली.

सदर प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले व सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांन्वये पुर्ण करण्यात आली. यावेळी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, मा. नगरसेवक तथा शहरप्रमुख किशोर बारावकर, सतिष चेडे, प्रविण ब्राम्हणे, प्रा. गणेश पाटील, भुषण पेंढारकर,  तसेच न. पा. अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.