वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नगर परिषदेच्या सन २०२२ सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसुचित जाती जमातीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार सर्वसाधारण महिलासाठी व अनुसुचित जाती जमातीसाठी राखीव जागेसाठी उप जिल्हाधिकारी (जळगाव) महेश सुदळकर व मुख्याधिकारी शे समीर प्रशासकीय अधिकारी पंकज सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात सन २०२२ साठी सार्वत्रीक निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगनना नुसार प्रभाग क्र ७ अ व प्रभाग क्रं ८ अ जागेसाठी अनुसुचित जाती जमातीसाठी सोडत कु निधी निलेश झांबरे या सहा वर्षाच्या बालीकेच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले तर इतर प्रभागातील राखीव जागेसाठी आरक्षण पुढील प्रमाणे..
प्रभाग क्र १) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र २) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ३) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ४) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ५) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ६) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ७) – (अ) अनुसुचित जाती महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ८) – (अ) अनुसुचित जाती महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र ९) – (अ) सर्व साधारण महिला (ब) सर्व साधारण
प्रभाग क्र १०) – (अ) सर्व साधारण महिला (क) अनुसुचित जाती सर्वसाधारण
असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी एकून दहा प्रभाग राहणार असून उमेदवाराची संख्या २१ आहे. यात ५० टक्के महिलासाठी राखीव असल्याने महिला सदस्याची संख्या अकरा राहणार आहे.