तीन मुलींच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सतर्कतेने उधळला

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे नागरिकांच्या सतर्कतेने तीन मुलींच्या अपहरणाचा डाव फसला.

गुरूवारी दुपारी राणीचे बांबरूड येथे दोन तरूण भंडार्‍यासाठी धान्य जमा करण्याच्या नावाने गावात आले. या दोन्ही तरुणांना गावातील काही जणांनी धान्य दिले. या दोघांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून घरी येणार्‍या तीन विद्यार्थीनींना बिस्कीटचे आमीष दाखवत घरी सोडून देणार असल्याचे सांगून त्या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून ते दोन तरूण निघाले.

या तिन्ही मुलांना घेऊन जात असतांना गावातील महिलांना त्यांच्यावर शंका आली. त्यांनी त्या तरूणांची दुचाकी अडविली. यामुळे त्यांनी मुलींना सोडून तेथून पळ काढला. यावेळी महिलांनी आरडा-ओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here