धक्कादायक; पाचोऱ्यात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील जारगाव चौफुली भागात चोरीच्या हेतुने दुकानाचे शटर तोडत असलेल्या आरोपीने, रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक सचिन पवार यांच्या डोक्यात टाॅमी मारत प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर जखमी अवस्थेतही आरोपीला पकडुन जेरबंद करणार्‍या पोलिसाच्या या शौर्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मात्र जेथे पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यास चोरटे हिम्मत दाखवतात तेथे खाकीचा धाक कमी झाला की चोरट्यांची हिम्मत वाढली ? हा प्रश्न चर्चेत आला आहे. दरम्यान या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जखमी पोलिस नाईक सचिन पवार यांची प्रकृती आता चांगली आहे.

प्राप्त माहीती नुसार १८ ऑगस्ट रोजी पहाटे पोलिस हवालदार दिलीप पाटील, पोलीस नाईक सचिन पवार, होमगार्ड राहुल शेळके, गणपत जाधव हे शासकिय वाहन एम. एच. १९ सी. झेड. ६१७९  यातून २ वाजेदरम्यान जारगाव चौफुली भागात गस्त घालत असतांना एका दुकानाला लावलेले कुलुप तोडतांना डोक्यावर केसरी रंगाची पगडी बांधलेला इसम नजरेस पडला. त्याने पोलीस गाडी पाहताच पळ काढल्याने गस्तीवरील सर्वांनी वाहन थांबवुन त्याचा पाठलाग केला. त्याने पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पौलीस नाईक पकडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याच्याजवळ असलेल्या एका लोखंडी टाॅमीने सचिन पवार यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारली. सचीन पवार हे थोडे मागे सरकल्याने सदरची टाॅमी हे त्यांच्या डाव्या डोळ्यावरील कपाळावर लागली. टाॅमीच्या पुढील बाजुस वाक असल्याने त्याच्या अनुकुचीदार भागाने सचिन पवार यांना दुखापत झाली. त्या तरूणाने सचिन पवार यास खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिन याने त्यास पकडुन जेरबंद केला. सोबत असलेल्या पोलीसांनी त्या तरूणास टाॅमीसह पकडुन ठेवले व दुसर्‍या इसमाबाबत विचारपुस केली असता त्याने ओळख देण्यास आणि माहीती देण्यास टाळाटाळ केली. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत काही साहित्य व पैसे आढळुन आले.

घटनास्थळावरून सदर तरूणाला घेवुन गस्तीपथक पाचोरा पोलीस स्टेशनला आले. जखमी सचिन पवार यावर वैद्यकिय उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस हवलदार दिलीप हिम्मत पाटील यांनी ताब्यात घेतलेला तरूण हा मलकापुर येथील असुन त्याचे नाव अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी (२२) असे आहे. दुपारी कजगाव येथुनही एका संशयीताला ताब्यात घेतले असुन पोलीस निरिक्षक राहुल खताळ यांनी रात्री घटनास्थळी तत्काळ हजर होवुन पोलिस सचिन पवार यांच्या उपचारासंदर्भात दखल घेतली. पोलिसांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असुन पोलीसांच्या खाकीचा धाक कमी झाला की चोरट्यांची हिम्मत वाढली ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.