कर्नाटक राज्यात कॉंग्रेसची सत्ता; पाचोऱ्यात जल्लोष….

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

कर्नाटक राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेसची निर्विवाद एकहाती सत्ता बसल्याने पाचोरा कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे कडून ढोल ताशा, फटाक्यानी जल्लोष करत पेढे वाटप करण्यात आले.

भाजपा ला कंटाळून महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी विरोधात कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेस ला एकहाती सत्ता देत लोकशाही ला माननारे राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. या विजयाचा जल्लोष पाचोरा कॉंग्रेस ने केला आहे. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाके फोडून आणि ढोल ताशाच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. तर शहरातील नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष इरफान मनियार, महीला जिल्हा प्रतिनिधी अॅड. मनिषा पवार, शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, ओ.बी.सी. सेल सरचिटणीस संदीप पाटील, अल्ताफ शेख, रहीम शेख, ए.सी. सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, प्रकाश भिवसणे, जलील शाह सुभान शाह, अक्रम शेख, अकलाख शेख, जुनेद खान, जावेद खान, आसिम मौलाना, परवेज खान आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.