पाचोऱ्यातील अल्पवयीन युवती अत्याचार प्रकरणात आरोपींना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

 

पाचोऱ्यात दिनांक ५ रोजी शहरातील मांग गारुडी समाजाच्या मुलीचा बालपणाचा फायदा घेऊन सात जणांनी सामूहिक अत्याचार (Mass atrocity) केला होता. त्या प्रकरणी पाचोरा (Pachora) पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिडीत युवती २७ एप्रिल रोजी कुणास काही एक न सांगता घर सोडून निघून गेल्याने २८ रोजी तिच्या आजीने पोलिसात नात हरविल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजया विसावे यांनी पिडीता शहरातील एका हॉटेलात जेवण करतांना आढळून आली होती. दरम्यान चौकशी अंती सर्व प्रकरणाचा खुलासा झाल्याने सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता, दरम्यान सुमित कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील ह्या सात जनांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिडीत युवती मांग गारुडी समाजाची असल्याने पुन्हा अॅट्रासीटीच्या कलम लावला गेल्याने सदरचा तपास पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्याकडे गेला आहे. सोमवारी पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी संशयित आरोपीची पाचोरा पोलिस ठाण्यात ओळख परेड घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.