जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून (ED) नोटीस देण्यात आली आहे.

तर पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी देखील ईडीकडून सांगण्यात आले आहे

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचं आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात सुरवातीला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

मात्र पुढे या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली. ज्या कंपन्यांना काम मिळाले होते, त्या कंपनीशी संबंधित लोकांवर ईडीने एकाचवेळी 9 ठिकाणी छापेमारी केली होती. पुढे या प्रकरणात ईडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी देखील केली. दरम्यान आता याच प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे देखील समोर येत आहे.

. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.