पाकिस्तानच्या अडचणीत वाढ, आशिया चषक खेळण्यास BCCI सह आणखी दोन देशांचा नकार!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आशिया चषक (Asia Cup) पाकिस्तानने (Pakistan) आपल्याकडे खेळवली जावी यासाठी जमेल ते प्रयत्न केले, नानातर्हेच्या धमक्या दिल्या पण बीसीसीआय (BCCI) आपल्या निर्णयावर ठाम होती. पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. आशिया चषक पाकिस्तानमध्ये न खेळवण्याच्या बीसीसीआयच्या भूमिकेला श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Sri Lanka Cricket Board) व बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) देखील आपला पाठिंबा दर्शविला आहे.

यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार असल्याचे म्हंटले जात आहे. पण भारतीय नियामक मंडळाने भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठविण्याचा निर्णय घेतल्याने PCB ची कोंडी झाली, व अडचणही वाढली होती. बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आशिया चषक पाकिस्तानबाहेर होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयात त्यात श्रीलंका व बांगलादेश यांनीही आपल्या खेळाडूंना पाकिस्तानात खेळायला पाठवणार नसल्याचे म्हंटले आहे. व भारताच्या निर्णयाला आपल्या पाठिंबा दर्शवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.