धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नलवाडे, नरेंद्र शिंदे, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता मयतची ओळख पटली नसुन रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मयतास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ज्ञानेश्वर पाटील हे घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.