Thursday, February 2, 2023

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपुरात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

- Advertisement -

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज नागपुरात (Nagpur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) पार पाडलं. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत.

पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा २ ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

तर नरेंद्र मोदी यांनी जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे