धक्कादायक; ४० वर्षीय महिलेकडुन अल्पवयीन मुलावर अत्याचार

पिडित अल्पवयीन मुलाची पोलिसात धाव

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलास दारू पाजुन दारूच्या नशेत त्याच्याशी शारीरीक संबध ठेवले. या प्रकाराचा व्हिडिओ काढुन तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे घेतले. मात्र पिडित मुलाच्या वडिलांना ही माहीती मिळाल्यावर त्यांनी जाब विचारला असता त्यांना शिविगाळ करीत मारहाण केली. झालेला त्रास असह्य झाल्याने पिडित तरूणाने पाचोरा पोलिसात धाव घेतली. पाचोरा पोलीसांनी त्या महीलेसह चार जणांविरूध्द बालकांचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालूक्यातील गावात व ह. मु. कुरबान नगर, जळगाव, साखळी ता. यावल येथे शिक्षण घेणारा रेहान इम्रान शेख (१७ वर्ष ७ महिने) हा मुलगा मार्च २०२० मध्ये लाॅकडाउन लागल्यानंतर मुळगावी येथे आले. तो गावातील जुनेद कोहिरून शेख याच्या सोबत राहु लागला. दरम्यान रेहान याचे जुनेदच्या घरी येणे जाणे सुरू होते. एक दिवस जुनेदने रेहानला दारू पाजली. जुनेदकडे असलेली त्याची आत्या अफसाना शेख यूनुस हिने रेहानला दारूच्या नशेत त्याचे कपडे काडण्यास सांगितले व स्वतःही कपडे काढुन त्याला अंगावर झोपायला लावले व बळजबरीने शारीरीक सबंध करायला लावले.

दुसर्‍या दिवशी अफसानाने रेहानला तु माझ्या अंगावर झोपलेला असतांना व्हिडिओ बनवला आहे. तु ५० हजार रूपये आणुन दे, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. रेहानने घरी जावुन १३ हजार रोख व कानातले आणुन दिले. नंतर २०२२ मध्ये जळगाव येथे असतांना अफसानाने रेहानला फोन करून व्हिडिओ व्हायरलची धमकी देत पुन्हा ५० हजार घेतले. २४ जुन २०२३ मध्ये रेहानच्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी सर्व परीवार त्या गावी गेले असता अफसानाने रेहानला संबध करायचे आहे का ? असे विचारले पण त्याने नकार दिल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५० हजार मागीतले. ते दिल्यावर रेहान परिवारासह जळगावला आला. २० नोहेंबर २०२३ रोजी चुलत बहीणीच्या लग्नानिमित्त पुन्हा गावी आले. पुन्हा पैशांची मागणी रेहानकडे झाली. मात्र यावेळी रेहानने पैसे दिले नाही व आजपर्यंत झालेली घटना वडिलांना कथन केली. वडिलांनी जुनेदला माझ्या मुलाशी असे का वागलात असा जाब विचारला असता त्यांनी रेहानच्या वडिलांना शिविगाळ करीत मारहाण केली. झालेला त्रास सहन न झाल्याने पिडित मुलाच्या बापाने पाचोरा पोलीस ठाण्यात येवुन जुनेद शेख कोहीनुर, कोहीनुर शेख यूनुस, अफसाना शेख युनुस व फरीद शेख यांचे विरूध्द बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन, घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक योगेश गणगे करीत आहेत. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.