लोहाऱ्यात ज्वेलर्स दुकान फोडले ; गुन्हा दाखल

0

पाचोरा;- ज्वेलर्स दुकानाचे शटरचे लॉक तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील लोहारा गावात घडली असून प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शंकर सोनवणे (वय-३२) रा. पहूर ता.जामनेर यांचे तालुक्यातील लोहारा गावात ओमसाई ज्वेलर्स शॉप नावाचे दुकान आहे. २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांचे दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ८ हजारांची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २८ ऑक्टोबर रोजी समोर आला. त्यांनी नजीकच्या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरविंद्र मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.