पाचोऱ्यात २४ वर्षीय पीडितेवर अत्याचार, वाचा सविस्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत असून, पोलिस प्रशासन करतंय तरी काय? असा सवाल सामान्य नागरिकांना पडत आहे. अशीच एक घटना जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाचोरा (Pachora) तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय महिला आपल्या मुलासह वास्तव्यास असून ती, शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून गावातील महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला तिचा मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत. तसेच महिलेने त्याला विरोध केला असता, महिलेवर विळ्याने वार करून, तिच्या हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार गेल्या दिड महिन्यांपासून ते २९ ऑगस्ट पर्यंतच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडला. पीडितेने पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र गुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.