वास्तु आरोग्यम् च्या डिप्लोमा इन वास्तुशास्त्र कोर्सला क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाची मान्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील सुप्रसिद्ध डॉ. अविनाश कुळकर्णी यांच्या वास्तु आरोग्यम् या नामांकीत संस्थेला त्यांच्या डिप्लोमा इन वास्तुशास्त्र या कोर्सकरीता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे संलग्नता प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, आता विद्यापिठामार्फत देखील वास्तुशास्त्र कोर्स करता येणार आहे.

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे आजिवन अध्ययन विभागातर्फे जळगाव येथील सुप्रसिद्ध डॉ. अविनाश कुळकर्णी यांच्या वास्तु आरोग्यम् या नामांकीत संस्थेला त्यांच्या डिप्लोमा इन वास्तुशास्त्र या कोर्सकरीता संलग्नता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सदरील कोर्स हा ६ महिने कालावधीसाठी असून ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना नोट्स, प्रॅक्टीकल सेशनसह अनेक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

भारतभरात ४५ फ्रँचाईजी असणार्‍या व विदेशात ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर, टाओस (अमेरीका), इटली, रशीया व दुबई या देशात फ्रँचाईजी असलेल्या जळगाव शहरातील सुप्रसिद्ध वास्तु आरोग्यम् या संस्थेकरीता ही गौरवास्पद बाब असल्याचे मत संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश कुळकर्णी व सी.ईओ. आकांक्षा कुळकर्णी यांनी व्यक्त केले. मिळालेल्या या संधीद्वारे आपले भारतीय प्राचिन विज्ञान अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास वास्तु आरोग्यमचे जे ध्येय आहे त्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे व आपले प्राचिन ज्ञान व विज्ञानाचा प्रचार व प्रसार होणार आहे. ज्यामार्फत विद्यार्थ्यांना चांगले अर्थार्जन देखील प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. अविनाश कुळकर्णी यांच्या वास्तु आरोग्यम् द्वारे जिओपॅथीक स्ट्रेट डिटेक्शन व ट्रिटमेंट, वास्तु शास्त्र कन्ल्टन्सी, रेसीडेन्शीयल व कमर्शियल बिल्डींगचे वास्तुशास्त्रानुसार प्लॅनींग, वास्तुदोष निवारण, पाण्याचे स्त्रोत शोधून देणे, वास्तु शास्त्र शिकवणे यासह अनेक वास्तुशास्त्राशी संबंधीत कामे केली जातात. डॉ. अविनाश कुळकर्णी यांचे भारतासह भारताबाहेर सुमारे ९००० विद्यार्थी कार्यरत आहेत व वास्तुशास्त्राच्या माध्यमातून उत्तम अर्थार्जन करीत आहेत. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आजिवन अध्ययन विभागाचे संचालक मा. प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांचेसह डॉ. अविनाश कुळकर्णी, सौ. आकांक्षा निखील कुळकर्णी यांनी केले आहे. संपर्कासाठी वास्तु आरोग्यम, मोहाडी रोड, गजानन महाराज मंदिराजवळील निमीष हॉल, जळगाव तसेच वेब साईट www.vastuaarogyum.com येथे भेट द्या अथवा [email protected] या इमेल वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.