महिलेशी अश्लील कृत्य ; एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

0

पाचोरा ;- तालुक्यातील एका गावात महिलेशी अश्लील कृत्य करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार केल्याप्रकरणी एका विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या घराचा 11 ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दरवाजा ठोठावून आरोपी उमेश प्रेमसिंग पवार याने दरवाजात उभे राहून तुझ्याजवळ झोपू दे अशी मागणी करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक शैलेश चव्हाण करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.