मणिपूर व एरंडोल येथे अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या

एकलव्य संघटनेची निवेदन देवून केली मागणी

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

राज्यात सध्या महिलांवर विद्यार्थीनीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठलाच कायद्याच्या धाक राहीलेला नाही. अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल खताळ व तहसीलदार प्रविण चव्हाणके यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देते वेळी जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव, तालुका युवा संघटक संदिप गायकवाड, तालुका महिला आघाडी प्रमुख लता सोनवणे पाचोरा शहर अध्यक्ष प्रतिभा पवार, सुनिल वाघ, बापु मोरे, संभाजी सोनवणे, दगडु सोनवणे, युवराज गायकवाड, सुनिल मोरे, साकराबाई मोरे, अलका गायकवाड, उपस्थित होते.

एरंडोल तालुक्यातील खडके बु” येथील आदिवासी विद्यार्थीनी वर झालेल्या लैंगिक अत्याचारातील आरोपींवर कठोर कारवाई करून संबंधित वसतिगृह, संस्थेवर कायमस्वरूपी बंद करून शासकीय मान्यता रद्द करण्यात यावी व भविष्यात असे प्रकार महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विद्यार्थीनी वर घडू नये यासाठी अजून कठोरात कठोर कायदे करण्यात यावे. खडकी बु” वसतीगृहातील झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. व तसेच मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर झालेल्या अमानवीय कृत्याची दखल घेऊन केंद्र शासनाने संबंधित दोषींना फाशी देऊन मणिपूर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे. या आशयाचे निवेदन एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांनी पदाधिकारी सोबत घेत निवेदन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.