मल्याळम चित्रपट ‘२०१८ : एव्हरीवन इज हिरो’ला मिळाले ऑस्करचे तिकीट

0

नवी दिल्ली ;- भारताकडून ‘२०१८ : एव्हरीवन इज हिरो’ या मल्याळम चित्रपटाला ऑस्करचं तिकीट मिळालं आहे. ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी (ऑस्कर) या चित्रपटाची एन्ट्री पाठविण्यात आली आहे. फिल्म फेडरेशनचे अध्यक्ष टीपी अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. ज्युड अॅन्थनी जोसेफ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तोविना थोमस, असिफ अली, विनिथ श्रीनिवास या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. २०१८ साली केरळमध्ये आलेल्या पूराचं भयावह वास्तव या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आलं आहे.

ऑस्कर हा कलाविश्वातील सर्वाधिक मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. दरवर्षी विविध कॅटेगरीत जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार प्रदान केला जातो. चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळणे ही मानाची गोष्ट समजली जाते.

गेल्यावर्षी दोन भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आता एका मल्याळम चित्रपटाची ऑस्कर २०२४साठी निवड करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. तर ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटाने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या पुरस्कारावर नाव कोरले होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.