ऑनलाईन फ्रेंड्स : एक आभासी जग, वेळीच जागे व्हा

0

 लोकशाही विशेष लेख

 

तुम्ही सोशल मीडियावर जितके जास्त पोस्ट कराल तितके अनोळखी लोक तुमच्याबद्दल जाणून घेऊ शकतात. ते तुमचा पाठलाग करण्यासाठी किंवा तुम्हाला गुन्ह्याचा बळी बनवण्यासाठी तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या सर्व माहितीचा वापर करू शकतात. हे वास्तव आता स्वीकारलेच पाहिजे. ऑनलाइन लोकांवर लवकर विश्वास न ठेवणे महत्त्वाचे आहे. इन्स्टंट मेसेजिंग सिस्टम (Instant messaging system), ईमेल (Email), सोशल मीडिया (Social media) आणि वेब फोरमसह अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे चॅट्स आयोजित केल्या जातात. परंतु हे सहसा मुलांना सायबर धमकी, घोटाळे, शिकारी आणि मालवेअर यांसारख्या धोक्यांना सामोरे जातात.

तुम्ही कोणाशी बोलत आहात हे तुम्हाला ठाऊक नसल्यास, तुम्ही तुमची माहिती तुमच्या विरोधात वापरणाऱ्या व्यक्तीला देऊ शकता. ऑनलाइन शिकारी सहसा त्यांच्या लक्ष्यांकडून माहिती मिळविण्यात खूप चांगले असतात. आकडेवारी दर्शवते की ७५ टक्के किशोरवयीन मुले ऑनलाइन वस्तू आणि सेवांच्या बदल्यात स्वतःची किंवा त्यांच्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती सामायिक करण्यास इच्छुक असतात. याव्यतिरिक्त, किशोरांना आमिष दाखविणाऱ्या ऑनलाइन लैंगिक शिकारींचा समावेश असलेल्या 100 टक्के प्रकरणांमध्ये, किशोरवयीन मुले गुन्हेगाराला भेटण्यासाठी स्वेच्छेने गेले आहे.

 

सोशल मीडियाच्या फ्रेंड वर विश्वास ठेवणे किंवा त्या आभासी जगाची निवड करण्याची कारणे

1 वास्तवातल्या मित्रांशी जास्त कॉन्टॅक्ट नसणं किंवा कमी मित्र परिवार असणं.
2 समाजापासून दूर राहणं.
3 कधी कधी घरचे आपल्याला समजून घेत नाहीत अशी भावना मनात निर्माण होणे किंवा घरात भीतीचं वातावरण असणं.
4 आपण दिसायला तेवढे खास नाही म्हणून आपल्या पासून लोक किंवा लोकांपासून आपण लांब रहावंसं वाटणं.
५ वास्तवात पाहता एक वेळ अशी येते की आपण पूर्णपणे एकटे पडतो आणि आपल्याला समजून घेणारं कोणीच नाही असे अनेक विचार करून आपण जेव्हा मग टोकाची भुमिका घेतो.

 

या आभासी गोष्टी पासून कसं वाचायचं किंवा दूर राहायचं?

1 समाजा मध्ये जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट बनवणे वास्तव कॉन्टॅक्ट बनवणे.
2 योग्य तेवढाच मोबाईल वापरणे आणि मोबाईल फ्रेंड लिस्ट पेक्षा वास्तविक फ्रेंड लिस्ट वाढवणे.
3 आपल्या वयक्तिक गोष्टी कोणासोबत शेयर करू नये कारण समोरचा कोण आहे हे कळणार नाही आणि जे ऑनलाइन फ्रेंड तुमचे मानसिक आरोग्य सुधरावत आहे असं तुम्हाला वाटतं तेच तुम्हाला धोक्यात टाकू शकतात.
4 प्रत्येकाकडे चांगले पालक, शिक्षक, मित्र, गुरू असतातच तर त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करू शकतो.
5 तुम्हाला वाचनाची आवड असेल तर पुस्तकांना मित्र म्हणून पाहा त्यांच्या सारखा विश्वासू मित्र तुम्हाला खूप उपयोगी येऊ शकतो.
6 भावनांच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचं वचन देऊ नका आणि तुम्हाला अस्वस्थ वाटणारे विषय टाळा किंवा भीती वाटणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका. कारण सोशल मीडियावर आपल्या भावना लगेच जागरूक होत असतात आणि आपण आपले सगळे सिक्रेट ओपन करून देतो. हे कुठे तरी आपण थांबवण खूप जास्त गरजेचं आहे.
7 प्रत्येक वेळी आपल्याला सायकॉलॉजीस्ट मिळेलच असे नाही. तुम्ही स्वतः स्वतःचा सायकॉलॉजीस्ट बना आणि स्वतःच्या विचारांना कसे समजवता येईल किंवा कंट्रोलमध्ये ठेवता येईल याचा विचार करा.
8 आपण आजारी पडल्यावर जशी आपल्याला डॉक्टरांची गरज असते तसच आपण मानसिक दृष्ट्या आजारी पडल्यावर देखील आपल्याला सायकॉलॉजीस्टची गरज असते. त्यामुळे खरंच गरज असेल तर स्वतःहून त्यांच्याकडे जा. कुणी आपल्याला वेडा म्हणेल असा विचार अजिबात करू नका. इतरांनीही एकमेकांना समजून घ्या. आपली माणसं आपल्या जवळ असताना त्यांचं महत्त्व असू द्या..

 

शब्दांकन
कोमल पाटील, जळगाव
९६८९९८९२६२

Leave A Reply

Your email address will not be published.