लेखी-मुलाखतीमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न

0

 लोकशाही विशेष लेख

 

दोस्तांनो आपण राज्य शासनाच्या विविध पदांच्या भरती करिता अभ्यास करत असाल तर हि महत्वाची माहिती खास तुमच्यासाठी असून या माहितीचा उपयोग तुम्हाला नक्की होऊ शकते. सर्वसामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. पोलिस भरती, तलाठी भरती तसेच एमएस्सी च्या लेखी परीक्षेत आणि मुलाखतीच्या फेरीत जनरल नॉलेज वर हमखास प्रश्न समोर येतात.

आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत.
प्रश्न – नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे
उत्तर –कोको न्यूसिफेरा
प्रश्न – आधुनिक भारताचे जनक कोण?
उत्तर – राजा राम मोहन राय
प्रश्न – आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू
प्रश्न – महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते?
उत्तर – राजघाट
प्रश्न – आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण?
उत्तर – ह. ना. आपटे
प्रश्न – स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण?
उत्तर – लॉर्ड रिपन
प्रश्न – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण?
उत्तर – ए ओ ह्यूम
प्रश्न – भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण?
उत्तर – सॅम पित्रोदा
प्रश्न – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?
उत्तर – दादासाहेब फाळके
प्रश्न – संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय होते?
उत्तर – ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

शब्दांकन : आनंद गोरे

Leave A Reply

Your email address will not be published.